Psalms 20

मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र.

1परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो,

याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
2देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो. तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.

3तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो,

आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
4तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो,
आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.

5तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू.

आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू.
परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
6परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे.
त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने,
तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्याला उत्तर देईल.

7काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात. आणि काही घोड्यांवर,

परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
8ते खाली आणले गेले आणि पडले,
परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!

परमेश्वर तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.

9

Copyright information for MarULB